in ,

…तेव्हा मला ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला, मुख्यमंत्र्यांची भाजपाच्या ‘या’ नेत्याला कोपरखळी

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा झाली. त्यात भाजपाच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. भाजपाच्या ‘या’ नेत्याच्या भाषणाबाबत बोलताना ते म्हणाले, मला ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला!

जळगावच्या शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना विवस्त्र करून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

त्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना उत्तर देताना सांगितले की, माझ्या केबिनमध्ये बसून कामकाज पाहताना अचानक मला भास झाला की मी नटसम्राट बघत आहे. मी अथेल्लो, मी हॅम्लेट… पण त्यांच्या भाषणाचा शेवट मात्र केविलवाणा वाटला. कुणी किंमत देता का किंमत… सुधीरजी, काय तुमचा आवेश… ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होते. चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना भीती वाटायला लागली की, आमचे कसं होणार? अशी कोपरखळी मु्ख्यमंत्र्यांनी मारली.

तुमचेही माझ्यासारखेच झाले आहे. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांचे फोटो काढले. पण सध्या ते करता येत नाही. तुमच्यातील देखील कलागुणांना वाव मिळत नाही. पण कलाकार हा कधीच लपून राहत नाही. तुम्हीही तुमच्यातील कलाकार मारू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Silver Rate: सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण

IT च्या छाप्यानंतर तापसी पन्नू व अनुराग कश्यपवर ट्रोल