in

बचपन का प्यार…! या गाण्यावर उमेश कामत व प्रिया बापटची धम्माल मस्ती

बचपन का प्यार या नवीन गाण्याने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावेल आहे. सध्या प्रत्येकजण या गाण्यावर ठेका धरत आहेत. अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे मराठीतील क्युट कपल म्हणून ओळखलं जाते. दोघेही सोशल मिडियावर सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, व्हिडिओ आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असतात. नुकताच या दोघांनी एक धमाल व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंट शेअर केला आहे. ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर उमेश व प्रियानं भन्नाट डान्स केला आहे.

व्हिडीओत उमेशनं ब्लेझर परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. तर प्रिया देखील रेड ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. सध्या हे गाणं सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत ‘बचपन का प्यार आणि काय हवं ‘? असे कॅप्शन दिले आहे. सध्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. यासोबतच या व्हिडिओला मराठमोळ्या सेलिब्रिटींनीही या व्हिडीओला पसंती देत कमेंट्स केल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“शिवसेना भवन फोडणाऱ्यांचं थोबाड फोडू” ; ‘या’ शिवसेना आमदाराचं प्रत्युत्तर..

Police Recruitment 2021 | पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…