in

‘आई किंवा वडिलांचे आडनाव लावण्याबाबत मुलांना स्वातंत्र्य’- दिल्ली उच्च न्यायलय.

शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे.’प्रत्येक मुलाला आपल्या आई किंवा वडिलांचे आडनाव निवडण्याचा अधिकार आहे. अशावेळी वडील मुलाला आडनाव लावण्यासाठी बळजबरी करू शकत नाहीत; असा निर्णय एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे.उच्च न्यायालायाच्या या टिप्पणीमुळे मुलांना आपल्या मर्जीनुसार आई किंवा वडिलांचे आडनाव लावण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट झाल आहे.

मुलीच्या कागदपत्रांमध्ये आपलेच आडनाव असावे असा आग्रह वडिलांनी धरला होता. याप्रकरणी त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने वडिलांची मागणी फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती रेखा पल्ली म्हणाल्या की, ‘मुलगी वडिलांची संपत्ती किंवा मालकी नाही, जे तिला आडनाव लावण्यास सांगू शकतात. अल्पवयीन मुलगी आपल्या आडनावासोबत खूष असेल, तर तुम्हाला काय अडचण आहे?’

मुलीचे आडनाव श्रीवास्तव असे बदलून सक्सेना करण्यात आले होते. त्यामुळे LIC पॉलिसीसंबंधात अडचणी येत होत्या. पॉलिसी वडिलांचे आडनाव असलेल्या मुलीच्या नावावर नोंद होती. त्यामुळे वडिलांनी दावा केला होता की, आडनाव बदलल्याने पॉलिसी क्लेम करणे कठीण जाणार होते. कोर्टाने याप्रकरणी याचिका फेटाळून लावली आहे. आई किंवा वडिलांचे आडनाव लावण्याबाबत मुलांना स्वातंत्र्य असल्याचं कोर्टाने म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात अजित पवारांच्या बैठकीला सुरुवात, लॉकडाऊन शिथिल?

#BanNetflix म्हणत “या” वेबसिरीज वर आक्षेप…