लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद तापला होता. हा वाद समोर आल्यापासून ‘मेड इन इंडिया’ Koo अॅप लोकप्रिय होत आहे. ट्विटरला स्वदेशी पर्याय म्हणून आता Koo अॅपची चर्चा सुरु आहे.
हा KOO अॅप काही मंत्रीही वापरण्यास सांगत आहेत. ‘मेड इन इंडिया’ या अॅपमध्ये चिनी गुंतवणूक असल्याचं समोर आलं आहे. अप्रम्या राधाकृष्णा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची कबुली देताना एका मुलाखतीत सांगितले की, Koo अॅपमध्ये चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक असल्याचं सांगितलं. “शुनवेई कॅपिटल या चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक अॅपमध्ये आहे, पण त्यांचा हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे ते लवकरच यातून बाहेर पडतील”,यासोबतच म्हणाले की, “शुनवेई कॅपिटलने सुरूवातीला आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता आम्ही ‘कू’ कडे लक्ष केंद्रीत केलं आहे, त्यामुळे शेनवाई लवकरच बाहेर पडेल” असे राधाकृष्णा यांनी सांगितले.
ट्विटर-केंद्र सरकारचा वाद काय?
शेतकरी आंदोलनादरम्यान चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावा करत काही ट्विटरवर निर्बंध लादण्याचे सरकारने दिलेले आदेश ट्विटरकडून पाळण्यात आले नाहीत. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू आहे. याचा चांगलाच फायदा मेड इन इंडिया Koo अॅपला झालाय.
Koo अॅप काय आहे?
Koo अॅप हे अप्रम्या राधाकृष्णा आणि मयंक बिदावत्कयांनी मार्च 2020 मध्ये डेव्हलप केलं आहे. Koo चा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातही केला होता. Koo अॅपवर भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे माइक्रोब्लॉगिंगचा अनुभव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर Koo म्हणजे ‘मेड इन इंडिया’ ट्विटर आहे. हिंदी, इंग्रजी, मराठीसह आठ भारतीय भाषांचा सपोर्ट या अॅपमध्ये आहे. Koo चा वापर अॅपसोबतच वेबसाइटवरुनही करता येतो.
Comments
Loading…