in

उद्धव ठाकरेंच्या उजव्या बाजूला राणे तर डावीकडे अजित पवारांची खूर्ची

कोकणवासियांसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. बहुचर्चित चिपी विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विमानतळाचं उद्घाटन होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, कार्यक्रमस्थळी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजुला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खूर्ची लावण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजुला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खूर्ची ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राजकीय किनार लाभलेली आहे.

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील शाब्दिक वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आपण जाहीर कार्यक्रमात महत्त्वाचा गौप्यस्फोट करणार आहोत, असं राणे म्हणालेले आहेत त्यामुळे राणे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिपी विमानतळाचे उद्घाटन; 16 वर्षांनंतर राणे-ठाकरे समोरासमोर, भाजपाचा बहिष्कार

CHIPI AIRPORT : दक्षिणेकडील राज्यांशी कनेक्टिव्हीटी वाढणार