in

Chipi Airport |अखेर प्रतिक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु चिपी विमानतळाची वाहतूक

लोकशाही न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाची वाहतूक येत्या 1 मार्चपासून सुरु होणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. या विमानतळाची वाहतूक 1 मार्चपासून होणार असली, तरी याचे उद्घाटन नेमकं कधी होणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

चिपी विमानतळावर कालपासून ट्रायल लँडींग सुरु झाली आहे. त्यामुळे आता लवकरच नियमित सेवा सुरु होईल. येत्या काही दिवसातच डीजीसीएची टीम येईल. त्यानंतर 1 मार्चपासून नियमितपणे सिंधुदुर्ग ते मुंबई आणि अहमदाबाद ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक सुरु होईल, असे विनायक राऊत म्हणाले.

चिपी विमानतळाचे काम आम्ही पूर्ण केलं. भाजप खासदार नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झालं होतं. मात्र आम्ही ते काम शंभर टक्के पूर्ण केले. त्यामुळे आता विमान वाहतूक सुरु करणार आहोत, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली.

उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार अशी माहिती समोर येत होती. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे कार्यक्रमाच्या पत्रिकेत लिहिण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रामदास आठवलेंची रिपाइं पाच राज्यांची निवडणूक लढवण्याच्या तयारीत

मुलुंड चेक नाक्याजवळ मॉडेल कॉलनीत आग