in

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटणार; शिवसेना-राणेंकडून वेगवेगळ्या तारखांची घोषणा

राज्यात येत्या काही दिवसात चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण आजचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली. तर या आधी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार असल्याची घोषणा केली होती. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच ९ ऑक्टोबर २०२१ रोजी उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्या दिवसापासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती दिली. तसेच त्या दिवशीचा कार्यक्रमही जाहीर केला. “९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजचा चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. मी आणि ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येऊ आणि तिथून सिंधुदुर्गला जाणार आहोत. मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.

दरम्यान याआधी नारायण राणे यांच्या उद्घाटनाच्या दोन दिवस आधी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नव्या तारखेची घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन;मुल्ला हसन अखूंद पंतप्रधान

Maharashtra Corona | राज्यात ३ हजार ८९८ नवीन बाधित