in ,

‘वनमंत्र्यांच्या मागे वाघ’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपा प्रचंड आक्रमक झाली असून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली. “महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नाही असं सांगत आहे. जी दोन मुलं प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिलं. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला.

पोलीस रक्षक आहेत की भक्षक आहेत अशी विचारणा करताना चित्रा वाघ यांनी नक्कीच यांच्यावर दबाव आहे असा आरोप केला. “पोलीस आमच्याकडे तक्रार नाही असं सांगत आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. यांच्याकडून तपास काढून घेतला पाहिजे. ते राजकीय दबाबाखाली काम करत आहेत. मी माझ्या २२ ते २४ वर्षाच्या समाजकारणात हे पाहिलेलं नाही,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

“सुओ मोटो अंतर्गत तक्रार का दाखल केली नाही असं मी विचारलं असता लेखी परवानगी नसल्याचं सांगत आहेत. कोणाची चाकरी करत आहात ? आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही असं ते वागत आहेत. नक्की कोणाची परवानगी हवी आहे हे स्पष्ट करावं,” अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची मतदारांना मारहाण

Farmer Protest | पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर