in

फोटो मॉर्फ प्रकरणी चित्रा वाघ यांनी केली पोलिसात तक्रार

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फोटो मॉर्फ प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेत त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपुर्वीच चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि शिवसेना नेते संजय राठोड एकमेकांच्या जवळ उभे असल्याचं दिसत होतं. मात्र प्रत्यक्षात चित्रा वाघ आणि त्यांच्या पतीचा जुना फोटो मॉर्फ करण्यात आला होता.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही यासंदर्भात चित्रा वाघ यांनी कल्पना दिलेली आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा सोन्या-चांदीचे आजचे भाव

महायुद्धातील ‘तो’ बॉम्ब फुटला