in

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या…

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा विषय लावून धरला होता. या पाश्वभूमीवर राठोड यांनी राजीनामा देताच चित्रा वाघ यांनी आपले मत माध्यमांसमोर मांडले आहे.

“संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला, तरी अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर ते पूजा चव्हाणला न्याय देण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असेल पाहिजे. हा विषय फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोड नसून राज्यातील महिला सुरक्षतेचा विषय आहे. महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. ” असे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.

संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आज १८ दिवस झाले. पण अजून एफआयआर दाखल झालेला नाही. आम्ही पोलिसांची भेट घेतली, पण अजून कारवाई झालेली नाही. राठोड यांना त्यांच्या जागेवर बसण्याचा अधिकार नाही” अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरण घटनाक्रम
7 फेब्रुवारी – रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पूजाची उडी मारून आत्महत्या
11 फेब्रुवारी – पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल
12 फेब्रुवारी – देवेंद्र फडणवीसांची पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी 12 ऑडिओ क्लिपमुळे मंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत
13 फेब्रुवारी – राष्ट्रीय महिला आयोगाचे तपास अहवाल पाठवण्याचे पोलीस महासंचालकांना आदेश
15 फेब्रुवारी – नातेवाईक आणि मित्रांचे जबाब घेण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक पूजाच्या मूळगावी
15 फेब्रुवारी – कुणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
17 फेब्रुवारी – पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं
23 फेब्रुवारी – अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड कुटुंबासह पोहरादेवीत
23 फेब्रुवारी – आपल्याबद्दल आणि समाजाबद्दल घाणेरडं राजकारण झाल्याचा राठोडांचा आरोप
24 फेब्रुवारी – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला संजय राठोडांची हजेरी
28 फेब्रुवारी – अखेर संजय राठोडांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुव्रत- सखीच्या आयुष्यात तिसऱ्याचं आगमन … शेअर केली आनंदाची बातमी

…त्यामुळेच राजीनामा दिला संजय राठोड यांचे स्पष्टीकरण