in

“महाविकास आघाडीत किती अलबेल आहे, हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय”

मागील दोन आठवड्यांपासून देशासह राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने आता राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यावर देखील प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता पुन्हा भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मतभेद असू शकतात. मात्र त्याचा अर्थ नाराजी आहे असा होत नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. याच दरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना सणसणीत टोला लगावला आहे. “महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय” असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

” संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय. एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय? संजयजी माझं आवाहन की तुम्ही ६ आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धुळ्यात कारागृहातून पळालेल्या आरोपीचे आल्पवयीन मुलीवर अत्याचार… एकजण अटकेत

सोनं चांदी झाले स्वस्त