in

Mumbai Rains : “ही कुणाची जबाबदारी?” मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता

मुंबईत बरसलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. दरवर्षीच्या पावसात मुंबई तुंबते. यावरून भाजपाने शिवसेनेला लक्ष्य करत टीका केलीय. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी मुंबईत पाणी तुंबण्यावर कविता लिहून ट्वीट केलंय.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. यावर चित्रा वाघ यांनी “पावसाच्या सरी येताच मुंबई भरली आहे, ‘ही’ कुणाची जबाबदारी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई तुंबली असतांना मुख्यमंत्री त्यांच्या घरी बसले आहेत. त्यांना जनता विचारत आहे ही जबाबदारी कुणाची, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेश; महाराष्ट्रात पडसाद

Tokyo Olympic | पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकिट!