in

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ… पतीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आक्रमक

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांविरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाने या बाबात कारवाई केली आहे.

अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत असताना २०१६ साली चार लाखांची लाच घेताना त्यांना अटक झाली होती. यानंतर संबंधित प्रकरणावर चौकशी पथक स्थापन झाले. तसेच त्यानंतर किशोर वाघ यांना बडतर्फ करण्यात आले. या प्रकरणात पुढे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी लावण्यात आली.

यामध्ये किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींपेक्षा जास्त रुपयांची बेहिशेबी संपत्ती सापडली. संबंधित रक्कम त्यांच्या उत्पन्नाच्या ९० टक्के असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तत्कालीन अधिकारी नवनाथ जगताप यांनी किशोर वाघ यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल केली. यानंतर आता पुन्हा किशोर वाघ यांचे प्रकरण प्रकाशात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच पत्रकार खाशोगी यांची हत्या

Petrol and diesel prices Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पाहा आजचे दर