in ,

लसीकरणासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा : पालकमंत्री शिंदे

ठाणे : निकेश शार्दुल | लसीकरण करुन घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सध्याच्या स्थितीत कोविड -19 चा सामना करण्यासाठी लस हा एकमेव उपाय आहे, तरी लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी कळवा येथे आयोजित केलेल्या लस महोत्सवादरम्यान केले. या महोत्सवादरम्यान तब्बल २७०० नागरिकांनी आपले लसीकरण करुन घेतल्याबददल श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज कळवा परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा “महालसमहोत्सव’’ आयोजित करण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंद व महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सध्यस्थितीत कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असून ठाणे महापालिकेच्यावतीने या लसमहोत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी कल्याण जिल्‍हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप महापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, स्थानिक नगरसेवक उमेश पाटील व आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले की, कोरोना जरी आटोक्यात येत असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. आतकोनेश्वर नगर, कोनपाडा, भास्कर नगर, आनंदविहार परिसर या ठिकाणच्या नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी येथे पहिला डोस घेतलेल्यांसाठी दुसरा डोस व ज्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही.यासाठी हा लसमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी या लसमहोत्सवास सहकार्य केल्याबददल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगाव जिल्हयात पावसाची दमदार सुरुवात

इसापूर धरणाचे 13 गेट उघडून पाण्याचा विसर्ग