in

कोरोनाच्या सावटामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया तूर्तास ऑनलाइन, शिक्षणमंत्र्यांची माहिती

राज्यातीस कोरोनाचे सावट लक्षात घेऊन इयत्ता अकरावीसाठीची प्रवेशप्रक्रिया तूर्तास ऑनलाइन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.

शासनाने गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर ही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली. कोरोनामुळे प्रवेश व शुल्क ऑनलाइन घेण्यात आले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. परंतु या जागा रिक्त राहू नये, असे प्रयत्न असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया रद्द करण्याबाबत विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यापुढील काळातही कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपाच्या ‘या’ नेत्याने ज्यांना जाकीट दिले त्यांना कोरोना…अजित पवारांची कोपरखळी

Ease of Living Index : केंद्राच्या यादीत मुंबईच्या तुलनेत पुणे टॉप