राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाली असून या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, बंद खोलीतले मुद्दे समोर येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोला संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला.
Comments
Loading…