in

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

मुंबईत खास करून पश्चिम उपनगरात रहाणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. बहुचर्चित मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या वर्षाअखेर दोन्ही मेट्रो सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न असणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरात रहाणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुंबईतल्या पश्चिम उपनगरात वाहतुकीची वर्दळ, वाहतूक कोंडी ही एक नेहमीची गोष्ट झाली आहे. तसंच या भागातून जाणाऱ्या पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या लोकलमधील गर्दी तर जीवघेणी आहे. असं असतांना पश्चिम उपनगरासाठी दोन मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहेत. येत्या 31 मेला मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे.

असा असणार मेट्रोचा मार्ग 

मेट्रो 2 ए मार्ग – दहिसर ते डी एन नगर
गजबजलेल्या लिंकिंग रोडवर मेट्रो 2 ए चांगला पर्याय ठरणार
18.589 किमी चा मार्ग, 17 मेट्रो स्थानके
प्रकल्प खर्च 6410 कोटी रुपये

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Silver Price | सोने-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आनंद महिंद्रांनी केले मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे कौतुक