in

मुंबईतील गर्दी वाढल्यास निर्बंध आणखी कडक करणार – मुख्यमंत्री

मुंबईतील मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या चाचणीचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आलं. मुंबईत वांद्रे येथे एमएमआरडीएकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईत लॉकडाऊन असताना देखील गर्दी आहे , अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अजित पवारांच्या विधानाचा दाखला देत मुंबईतील गर्दीवर नाराजी व्यक्त केली. ” कोरोना काळात विकासकामे थांबली नाहीत. या विकासकामांमुळे शहरांचा वेग वाढणार आहे.निर्बंध उठल्यानंतर आयुष्य अजून वेगवान होईल. परंतु मी काल लॉकडाऊन उठवत असल्याचं तर काही चुकून बोललो नाही ना असं मी अधिकाऱ्यांना विचारलं. इथं येताना रस्त्यावर बरीच गर्दी दिसली हे योग्य नाही. मुंबईत जर अशीच गर्दी कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“लसींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावताय का? , सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले खडेबोल

Mumbai Metro | आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर भाजपचं काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन