in

खेड, चिपळूणमधील अतिवृष्टी; मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत २३ लाखांचे वाटप

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण येथे पुराने थैमान घातला. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या नागरिकांना त्या धक्क्यातून सावरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. चिपळूणमध्ये येऊन गेलेल्या महापुरानंतर अनेकांनी डोक्यावरचे छप्पर, जीवलग गमावले आहेत. अनेकांचे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले आहे.मात्र त्याबरोबर मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत २३ लाखांचे वाटप झाले आहे.

खेड, चिपळूण अतिवृष्टीतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाखांची मदत देण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. आजपर्यंत यातील २३ लाखांचे वाटप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांच्या वारसांना १ कोटी ८ लाख रुपयांचे तर जखमीना १ लाख ५३ हजार रुपयांची मदत देण्यात आली. आपत्तीत बाधित गावामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे मोफत गहू आणि तांदुळ पुरवठा करण्यात येत असून आजपर्यंत २०७ गावातील ६४४६ कुटुंबांना ६४४.६० क्विंटल गहू आणि ६४४.६० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. बाधितांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. यात ऑनलाईन पध्दतीने आजर्यंत ५०३८६ व ऑफलाईन पध्दतीने ३१२१ अशा एकूण ५३५०७ शिवभोजन थाळींचे वाटप झालेले आहे. तसेच ६४ बाधित गावांतील २५६० कुटुंबांना १२ हजार ८०० लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या जिल्हा बँकेला ईडीचं पत्र

राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत; कल्याणमध्ये हॉटेल मालकांनी वाटले पेढे