in

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. पण या प्रकरणी विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. निष्पक्षपाती तपास झाला पाहिजे. केवळ राज्यात सत्ता नाही म्हणून विरोधकांनी राज्याची बदनामी करू नका असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे

एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे . संजय राठोड यांनी राजीनामा दिला असून तो स्वीकारला सुद्धा आहे. महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिसांवर नेहमीच अविश्वास दाखवला जातो. असे न करता तपासयंत्रणेवर विश्वास ठेवावा. राठोड प्रकरणाचा तपास नीट होऊ द्या. चौकशी होऊ द्या. केवळ आदळआपट करू नका. आज तुम्ही ज्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवत आहात तीच यंत्रणा आताही काम करत आहे, असं सांगतानाच तुमच्याही काळात ज्या घटना घडल्या. त्याच पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत असाल तर आश्चर्यच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तापस झाल्यानंतर कुणालाही पाठीशी घालणार नाही आरोपीला क्षमा मिळणार नाही. अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे हीच राहील . प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…त्यामुळेच राजीनामा दिला संजय राठोड यांचे स्पष्टीकरण

मराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसले आक्रमक