मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील. मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी वारंवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकारची भूमिका जनतेसमोर ठेवली होती. आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अमरावती आणि धुळे जिल्ह्यात काही काळासाठी संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यासंदर्भात अशाप्रकारचा कुठला निर्णय जाहीर करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेले आहे.
Comments
Loading…