गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आलेख वाढत चालला होता. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार कि अशी भीती सर्वांसमोर होती. अखेर यावर जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेच. राज्यावर बंधने आणण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय पुढील आठ दिवसात घेण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा असा सल्ला हि त्यांनी जनतेला दिला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उद्या सोमवारपासून सर्व राजकीय कार्यक्रम,धार्मिक मिरवणुका आंदोलनावर बंदी घालण्यात येत आहे.कोरोनाची लाट आली आहे की नाही येत्या काही दिवसांत कळेलच. लॉकडाऊनचा निर्णय जनतेच्या हातात आहे. शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा असा सल्ला त्यांनी दिला. तसेच पुढील आठ दिवसात लॉकडाऊन लागू करायचा कि नाही असा निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
Comments
Loading…