in

‘कोरोना चाचण्या वाढवा, बाधितांचा संपर्क शोधा’

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन उपाययोजना करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. प्रत्येक बाधितामागील संपर्क शोधा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. आरोग्य विभाग, कोरोना आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाबात बैठकीत चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कसा असणार, याबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

राज्यात लसीकरणाचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. साठ वर्षांवरील व्यक्तिंना लस देण्यात येणार असून त्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी १ मार्चपासून देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. राज्यातील चाचण्या वाढवा आणि प्रत्येक बाधितामागील संपर्क शोधा, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चोरीची अजबच घटना; स्मशानभूमीतून राखचं चोरली

PSU Bank Privatisation | सरकारी बँकांचे खासगीकरण – पंतप्रधान