मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 11 मार्च रोजी त्यांनी भारत बायोटेकच्या Covaxin लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 27 दिवसांनी त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचाही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. काल शरद पवार यांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस सिल्व्हर ओक येथे घेतला. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसंच त्यांनी पात्र असलेल्या सर्वांना लस घेण्याचे आवाहनही केले आहे.
Comments
Loading…