in

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी ‘संवाद’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहे. राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर मुख्यमंत्री एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. याचसोबत १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार आहे. यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही संकेत दिले होते. अखेर मुख्यमंत्री आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. यामध्ये ब्रेक द चेन संदर्भात नवे नियम व अटींबाबत मुख्यमंत्री स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोना लाटेचा जोर ओसरत असताना मुख्यमंत्री लसीकरणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका मांडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यभरात १३० रुग्णालयांमध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचार होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याबाबत देखील राज्यसरकारचा अॅक्शन प्लॅन स्पष्ट होण्याची शक्यत आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today | सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ

व्हायरल व्हिडीओ| धक्कादायक! दोघांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह फेकला नदीत