in

Omicron Variant : ‘लॉकडाऊन नको असेल तर बंधने पाळा’, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवीन प्रकाराने पुन्हा संपुर्ण जगाला हादरवलं आहे. या संबंधित एक रूग्ण नजीकच्या राज्यात सापडल्याने राज्यातील सरकार देखील सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावत चर्चा केली. यावेळी पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावी लागतील, असं इशारावजा आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत ओमिक्रॉन विषाणूबाबत आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे आदेश दिले. तसंच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind vs NZ 1st Test | चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची 1 बाद 4 धावा, 284 धावांचं लक्ष्य

19 दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाचे काम ठप्प, असं सरकार चालतं; चंद्रकांत पाटलांची टीका