in

दरड कोसळून मृत झालेल्यांच्या वारसांना मदतीचे वितरण सुरू, पंचनामेही सुरू

flood in raigad, IAS nidhi choudhari, nidhi choudhari news, raigad landslide news

रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीत दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 95 जणांना आपला जीव गमवावा लागला. आता त्यांच्या वारसांना मदत वाटपास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पोलादपूरच्या 11 व तळीये येथील 31 अशा 42 मृतांच्या वारसांना एसडीआरएफ च्या निकषांप्रमाणे प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचे वितरण करण्यात आले आहे.

उर्वरित मृतांच्या वारसांनाही मदत दिली जाणार आहे. त्यासाठी वारस निश्चितेचे काम सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रथम एसडीआर एफ अंतर्गत मदत दिली जाईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 1 लाख तर पंतप्रधान सहायता निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. हे काम वेगाने व्हावे यासाठी जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रायगडमध्ये 42 मृतांच्या वारसांना 4 लाखाची मदत; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रुग्णास टोकरीत टाकून पायवाटेने उचलून आणलं, पावसाने रस्ता खचला