in

सोमवारपासून महाविद्यालय सुरू; सरकारची नियमावली जारी

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कित्येक महिन्यांपासून बंद असलेली विद्यालये, महाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. शारीरिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आदी कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबरोबरच ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घातली आहे. यासंदर्भातील परिपत्रक उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे.

कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आता कृषी विद्यापीठ त्याच्याशी संलग्न शासकीय, विना अनुदानित विद्यापीठ, महाविद्यालय, विद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. ५० टक्के विद्यार्थी उपस्थिती मर्यादा, कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक असेल. मात्र, संबंधित विद्यापीठाने आपत्ती व्यवस्थापनशी चर्चा करुन महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने केल्या आहेत.

या आहेत मार्गदर्शक सूचना

  • राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विना अनुदानि विद्यालये व महाविद्यालयांना १५ फेब्रुवारीपासून मान्यता दिली आहे.
  • प्रतिबंधित प्रक्षेत्रातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित विद्यालये / महाविद्यालये आयुक्त, महानगरपालिका / नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा आढावा घ्यावा. याप्रकरणी संबंधित विद्यापीठांनी स्थानिक प्राधिकरणांची सहमती घेऊन महाविद्यालये सुरु करावीत.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ५ नोव्हेंबरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून ५० टक्के पर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पध्दतीने वर्गात प्रवेश द्यावा.
  • कोविड -१९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ५ नोव्हेंबर २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाका फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू

अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा बंद