in

Colour Code Sticker | मुंबईत वाहनांवरील कलर कोड सक्ती रद्द, कारण…

मुंबईत रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली नसल्याने मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र, नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पद्धत पोलिसांसाठीच तापदायक बनल्याने अवघ्या सात दिवसांत कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार, मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड असणार आणि भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ही पद्धती लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना मोठा गोंधळ उडत असल्याचे पाहायला मिळत होते. नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम होताच शिवाय पोलिसांसाठीही मनस्ताप झाला होता. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS vs MI: पंजाबचा मुंबईवर विजय

Sachin Tendulkar Birthday | मास्टर-ब्लास्टरच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव