in

आरामदायी विस्टाडोम कोकण रेल्वे मार्गावरून धावली

आरामदायी प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्माण केलेली विस्टाडोम रेल्वे आज पहिल्यांदाच जनशताब्दीला एक डब्बा जोडून कोकण रेल्वे मार्गावरून धावली. खरतर कोकण रेल्वे ज्या मार्गावरून धावते तो मार्ग डोळ्यात साठवणे म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई, नीळ आकाश, डोंगर माथे आणि पावसाळ्यात ओसंडणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमीच्या रेल्वेच्या गाडीतून हा अनुभव पूर्णपणे मिळतोच असे नाही.

प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने विस्टाडोम ही वेगळी रेल्वे तयार केली आहे. काच लावलेल्या मोठमोठ्या खिडक्या, बोगीत प्रशस्थ जागा, गोल फिरणाऱ्या खुर्च्या, शेवटची मोठी विंडो, अन्य सोयी सुविधांनी असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच विस्टाडोम रेल्वे चा पहिला प्रवास आज कोकण रेल्वे मार्गावरून झाला. कोरोनाच्या काळातही त्यातून बाहेर पडून नवी ऊर्जा मिळवण्यासाठी असा आल्हाददायक प्रवास नक्कीच आनंद देणारा ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनुष्यवस्तीत शिरला बिबट्या; सीसीटीव्हीत कैद

Momsoon 2021 | मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरूवात