in ,

दिलासादायक; नवीन कोरोना रुग्णसंख्येत 2 हजाराने घट

राज्यात गेल्या चार दिवसांपासून दररोज 8 हजाराच्या पल्ल्याआड असणारी नवीन कोरोना रुग्णसंख्या आज 6 हजारावर आली आहे. त्यामुळे आज जवळ जवळ 2000 हजाराहून अधिक कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यासह आरोग्य विभागासाठी हा काहीसा असेल.

मागील २४ तासांमध्ये राज्यभरात 6 हजार 397 नवे कोरोनाबाधित वाढले असून, 30 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याचबरोबर 5 हजार 754 जण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता 21 लाख 61 हजार 467वर पोहचली आहे.

राज्यात आतापर्यंत 20 लाख 30 हजार 458 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या 77 हजार 618 आहे. आजपर्यंत राज्यात कोरोनामुळे 52 हजार 184 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Angarki Sankashti Chaturthi 2021; अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त आणि पूजा विधी

”पंतप्रधानांना हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही”