in

संत्र्याला १ लाख रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई द्या- अनिल बोंडे

सूरज दहाट, अमरावती | अमरावती जिल्ह्यात संत्र्याची मोठ्या प्रमाणावर गळण होत आहे.त्यामुळे संत्र्याला १ लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केली आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, परंतु, या वर्षात आंबिया बहराला गळती आल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात संत्राची मोठ्या प्रमाणावर गळण होत आहे. त्यामुळे चांदुरबाजार तालुक्यातील संत्रा बागाची पाहणी माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी करत संत्राला प्रति हेक्टर १ लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मतदार संघातील संत्रा गळत होत असल्याने बच्चू कडू यांनी दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रायगडात पर्यटनाच्या निमित्ताने येऊन चोरी करायचे, दोघांच्या आवळल्या मुसक्या

पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा मनमुराद आनंद