in ,

‘होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ।।’ सेलिब्रिटिंजच्या ट्विटमागे भाजपा, काँग्रेसकडून पुनरुच्चार

शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिंनी केलेले ट्विट आणि त्याला भारतातील सेलिब्रिटिंनी दिलेले उत्तर यावरून अद्याप काँग्रेस आणि भाजपामध्ये वादंग सुरूच आहे. आज विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भाष्य केले आणि त्यावरूनच काँग्रेसने संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत, भाजपावर निशाणा साधला आहे.

सेलिब्रिटिंनी केलेल्या ट्विटबद्दल फडणवीस म्हणाले की, असे समजा की मी त्यांना ट्विट करायला सांगितले. माझ्या देशाबद्दल अपप्रचार होत असेल तर, त्यांना मी ट्विट करायला सांगणे यात मी काय गुन्हा केला?

याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, ही भाजपाची कबुली आहे, असे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ”होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ।। तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ।।’ मनात भाव होता तो शेवटी तोंडातून बाहेर पडला. तुकाराम महाराज म्हणतात, मनात लपवलेलं कपट, वाईट विचार असेल तर तो आपोआप तोंडातून बाहेर पडतो. कितीही सोज्वळतेचा आव आणला तरी मूळ रुप शेवटी उघड होतं, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

भाजपातर्फे सेलिब्रिटींना ट्विट करायला भाग पाडले गेले, हे आता स्पष्ट झाले आहे. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्विट एकाच का? सुनील शेट्टीने भाजपा पदाधिकाऱ्याला टॅग का केलं? यांचे उत्तर मिळाले. आता भाजपाने दबाव टाकला का? धमक्या दिल्या का? यांचेही उत्तर चौकशी अंती मिळेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाचा आलेख चढाचं; 7 हजार 863 नवे कोरोना रुग्ण

आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूकच…राहुल गांधींचे मोठे विधान