in

नाना पटोलेंचा घुमजाव; ”माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मनगढत कहाण्या रचून आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याचा डाव सुरू आहे. पण विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर पलटवार केला. (”नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी”)

नाना पटोले (Nana Patole) यांनी लोकशाही न्यूजशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याचा कसा विपर्यास झाला आणि आपण नेमकं काय बोललो याचा खुलासा केला. मी अत्यंत प्लेनली बोललो होतो. त्याचा विपर्यास केला गेला, असं पटोले (Nana Patole) म्हणाले. (‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहेत’)

तसेच आमचा विरोध भाजपला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी आमची दुश्मनी नाही. हे सरकार पाच वर्षे चालेल. आमच्यात मतभेद नाहीत. भाजपचा सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच या मनगढत कहाण्या पेरल्या जात आहेत. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीच या कहाण्या रचल्या जात आहेत, असं सांगतानाच सरकारमध्ये कोणतीही गडबड नाही. आम्ही मिळून काम करत आहोत. आघाडीत नाराजी नाही. आमचं सरकार व्यवस्थित सुरू असून आमचं सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला.

पवारांच्या प्रतिक्रियेवर पटोले म्हणाले ?

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय मी घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परीक्षा शुल्काविरोधात चंद्रपुरात विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन

पाटणमध्ये सरपंच यांची शिवशाही सरपंच संघटना