काँग्रेसमधील एक गट जम्मू काश्मीरमध्ये एकत्र येत आहे. पक्षात २३ नेत्यांचा एक गट आहे. हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. या गटाचे नेते जम्मूमध्ये एकत्र येणार आहेत.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा, उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल हे नेते जम्मूत पोहोचले आहेत. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार विवेक तन्खा आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारीदेखील जम्मूत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला आणि दुसरीकडे राहुल गांधींनी उत्तर-दक्षिण केलेलं विधान या पार्श्वभूमीवर हे सर्व नेते जम्मूत एकत्र येणार असल्याची माहिती आहे. ‘गांधी ग्लोबल फॅमिली’ नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यक्रमासाठी सर्व नेते एकत्र येणार असल्याची माहिती आहे.
Comments
Loading…