in , ,

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का ? शरद पवार म्हणाले…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीच्या चर्चांना ऊत आले आहे. या आघाडीत काँग्रेसचा समावेश असेल का असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशात भाजपाविरोधी पक्षांची नवी आघाडी देशात आकाराला येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवताना दिसत आहेत. हे तर्कवितर्क आता खरे ठरताना दिसत आहेत. यासोबत या नव्या आघाडीमध्ये काँग्रेस असेल का? या प्रश्नावरून शरद पवार म्हणाले, “काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचं असेल, तर त्यांचं स्वागत आहे”, असं म्हणत काँग्रेसही या आघाडीत असू शकेल, हे पवारांनी स्पष्ट केलं. “कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे, सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन चालायचं”, असं पवार म्हणाले.

भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं देखील ते म्हणाले. “आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सारख्या विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासोबतच, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे”, असं शरद पवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच

महाराष्ट्राला सहाव्यांदा दुहेरी मुकूट; किशोरांचे १० वे तर किशोरींचे १५ वे अजिंक्यपद