in ,

Congress President Election | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा मुहूर्त ठरला….

काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या जून महिन्याच्या 23 तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे.

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी थेट गांधी घराण्याला आव्हान दिल्यानंतर निवडणूक होणार हे नक्की होतेच. अखेर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या जून महिन्याच्या 23 तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या शर्यतीत कोण कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन

नाशिकमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय, जाणून घ्या नवे नियम