in ,

शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांना विरोध कसा? बाबरी मशिदीवरून काँग्रेसचे एका दगडात दोन पक्षी!

बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणावरून गेले दोन दिवस राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये यावरून वाक्-युद्ध रंगले आहे. त्यातच आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. याबाबत टिप्पणी करताना काँग्रेसने भाजपाबरोबरच अप्रत्यक्षपणे शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाला सुनावताना बाबरी मशीद विद्ध्वंसाच्या घटनेचा दाखला दिला होता. आयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा, ‘येरे गबाळे’ पळून गेले. बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते की, बाबरी मशीद पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर, मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. हे आहे हिंदुत्व. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिले होते. बाबरी मशीद पाडली तेव्हा हे कुणीही तिथे नव्हते, आम्हीच पुढे होतो, असे त्यांनी सुनावले होते.

आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. बाबरी मशीद पाडणे हा भारतीय लोकशाहीवरील कलंक होता आणि शिवरायांच्या विचारांच्या विरोधातही आहे. शिवरायांनी मशीद पाडली नाही, बांधून दिली. शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांना विरोध कसा होऊ शकतो? भाजपाला ते भूषणावह वाटत असेल तर, न्यायालयात मान्य का नाही केलं? पळ का काढला?, असा सवाल करत सचिन सावंत यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…आत्महत्येचा मला व्हिडीओ पाठव, आयेशाचे पतीसोबतचे शेवटचे संभाषण पोलिसांच्या हाती

१ एप्रिलपासून वीज दरात २ टक्के कपात होणार