in

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीना दिलासा

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी 10 मार्च रोजी दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आपल्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरला उच्च न्यायालयात फेटाळण्याची विनंती अर्णब गोस्वामी यांनी केली होती, त्यावर न्यायालय 16 एप्रिलला सुनावणी करेल, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने अलिबाग कोर्टातील अपील्सपासून दिलासा दिला आहे. याप्रकरणी 10 मार्च रोजी दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरला उच्च न्यायालयात फेटाळण्याची विनंतीही अर्णब यांनी केली आहे, त्यावर न्यायालय 16 एप्रिलला सुनावणी करेल.

काय आहे प्रकरण ?
2018मध्ये इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी अर्णब, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना 4 नोव्हेंबर 2020 रोजी अटक केली होती. 11 नोव्हेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ते सध्या जामिनावर सुटले आहेत. अर्णब आणि इतर दोघांवर थकबाकी न भरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रायगड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या आत्महत्येप्रकरणी अर्णबचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी रायगड पोलिसांनी 1900 पानांचे आरोपपत्रही दाखल केले आहे. ज्यामध्ये 65 जणांचे निवेदन नोंदविण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind vs Eng : ऋषभची ‘सुंदर’ शतकी खेळी; दिवसअखेर भारत 7 बाद 294!

राज्याचा आर्थिक पाहाणी अहवाल : उद्योग, सेवा क्षेत्रात घसरण तर, कृषी क्षेत्रातील चित्र आशादायी