in

Constitution Day | आज संविधान दिन… का साजरा केला जातो हा दिवस?

 भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याची परंपरा फार जुनी नाही, परंतु हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून ओळखल्याचा इतिहास आहे. खरे तर या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. होय, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली, पण त्याच्या दोन महिने आधी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने अनेक चर्चा आणि दुरुस्त्या करून अखेर संविधान स्वीकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो.

संविधान दिन का साजरा केला जातो?
देशाच्या संविधानाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार व्हावा यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारताने आपली राज्यघटना स्वीकारली होती, त्यामुळे सामाजिक न्याय मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी निर्णय घेतला होता की भारत सरकार 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू करेल.

हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आज देशभरात संविधान दिनाचा उत्साह आहे. संविधान दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. या कार्यक्रमात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष संबोधित करणार आहेत. भाषणांनंतर राष्ट्रपती संविधानाची प्रस्तावना वाचन करतील. ज्याचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Vaccination : महाराष्ट्रात ११ कोटी नागरिक बनले बाहुबली

हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी सक्षम व्हायला हवं – मोहन भागवत