in

पुणे मुंबई हायवेवर कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबली

पुण्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याने पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात घाट परिसरात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास झाला असून महामार्गावरील साहित्य बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सामान घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाचे अमृतांजन ब्रिज जवळील घाट परिसरात गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर महामार्गावर उलटला. कंटनेरमध्ये असलेले लोखंडी साहित्य महामार्गावर पडल्याने पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर दोन ते तीन किलोमिटरच्या रांगा लागल्या आहेत. तर वाहन चालकांनी आपली वाहने मुंबई लेनच्या दिशेने वळवल्याने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक मंदावली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोयाबीनचे दर कोसळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक फिरोझ खान