in ,

मंत्रिमंडळातील ‘सखाराम बायंडर’ प्रवृत्तींचं काय करायचं त्यावर चिंतन करा’

लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्यपालांचं काय करायचं याचं चिंतन करण्यापेक्षा मंत्रीमंडळातील सखाराम बायंडर प्रवृत्तीचं काय करायचं, याचं चिंतन करा, असा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमान उड्डाणाच्या वादावर शिवसेनेने ‘सामना’तून या राज्यपालांचे करायचं काय? हा भाजपचा प्रश्न असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी हा टोला लगावला. सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. कारण या प्रकरणात भाजपने वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे.

राज्यपालांना विमान नाकारले हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला फडणवीस यांनी मारला. केंद्रीय गृहमंत्रालयास भारतीय संविधान, नियम, कायदा वगैरेंची चाड असेल तर अशा राज्यपालांचे पूर्ण वस्त्रहरण होण्याआधी गृहमंत्रालयाने त्यांना परत बोलवायला हवे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्राला आघाडी सरकारवर नेम धरता येणार नाही. सरकार स्थिर व मजबूत आहे आणि राहील. राज्यपालांचे काय करायचे हा भाजपचा प्रश्न !

दरम्यान, याला उत्तर देताना भाजपचे आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. ‘राज्यपालांचे करायचे काय?असा प्रश्न पडलाय? म्हणजे भारतरत्न महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? तीच तुमची खरी अडचण आहे का? ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही. घटनेनुसार विधिमंडळाचे कामकाज होत नाही. घटनेनुसार आमदारांना दिलेले हक्क तुम्हाला मान्य नाही. पंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश अशा घटनात्मक पदांचा आदर करीत नाही. राज्यपालांचे करायचं काय? यापेक्षा जमलं तर मंत्रीमंडळातील सखाराम बायंडर प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा’, असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ना सच्चे ना अच्छे…’ राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पुतळ्याचे राजकारण आता कोकणातही! दंगल नियंत्रण पथक तैनात