in

पंतप्रधान मोदींनी खरंच बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता का?

पंतप्रधान मोदी सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्ही मित्र सहभागी झालो होतो, असं मोदी म्हणाले. यानंतर एकच वादंग निर्माण झालं. मोदींचा दावा खोटा असल्याचं सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले –
‘मी बांगलादेशातील बंधू, भगिनींना आणि येथील तरुण पिढीला अभिमानानं आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणं, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझं वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरुंगात जाण्याचीही वेळ आली होती’, असं मोदी म्हणाले.

पुस्तकात उल्लेख –
एका वाहिनीचे कार्यकारी संपादक ब्रिजेश कुमार यांनी यासंदर्भात एक टि्वट केलं आहे. मोदींनी केलेला दावा खरा असल्याचं कुमार यांनी म्हटलं आहे. ‘पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या निर्मितीसाठी सत्याग्रह केला आणि त्यासाठी तुरुंगात जावं लागल्याचा उल्लेख ढाक्यामध्ये केला. त्यानंतर त्यांच्या टीकाकारांच्या पोटात दुखू लागलं आहे. यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारं वातावरण तयार केलं जात आहे. यावरुन टीका करणाऱ्यांना 1978 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं शेवटचं पान पाहून निराश व्हावं लागेल, असं म्हणत सिंग यांनी या पुस्तकाचे दोन फोटो टि्वट केले आहेत.

दरम्यान, सिंग यांनी पोस्ट केलेलं पुस्तक हे मोदींनी लिहिलेलं असून त्यामध्ये मोदींनी गुजरातमधील विविध संघर्षामधील आपले अनुभव सांगितले आहेत. हे पुस्तक मोदींनीच लिहिल्याच्या मुद्यावरुन नेटकऱ्यांनी सिंग यांना ट्रोल केले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दीपाली आत्महत्या : संतप्त महिलांची आरोपी विनोद शिवकुमारविरोधात घोषणाबाजी

अंबरनाथमध्ये केमिकलच्या टाकीत गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू