in

corona 3rd wave | सोलापुरात 600 बालकांमध्ये आढळली कोरोना लक्षणं

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेची लाहुल लागली आहे. सोलापुरात तब्बल ६०० बालकांमध्ये कोरोनाची सदृश लक्षणे आढळून आली आहेत. कोरोनाची तिसरी लाट लहानमुलांवर प्रभावी ठरणार अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली होती. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी ती निवळली नसल्याचे पाहायला मिळतेय. त्यातच सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना पुर्णपणे हद्दपार झालेला नाही.

त्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध अभियान राबविले जात आहेत. त्यातच मागील दोन महिन्यांपासून लहान मुलांचे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने माझे मूल माझी जबाबदारी हे अभियान राबवले जात आहे.

या अभियानांतर्गत जवळपास 5 लाख पन्नास हजारहून अधिक मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मागील दोन महिन्यात 600 हून अधिक मुलांमध्ये कोरोनासदृष लक्षणे आढळली आहेत. मात्र ते पॉझिटीव्ह नाहीत. तसंच त्यातील 560 हून अधिक मुले बरी झाली आहेत. तर 65 मुले कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आलेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनधिकृत बांधकामांमुळे कल्याण मलंग रोड ते उल्हासनगर रस्ता बाधित

“वीजबिल वसुली करा पण इंग्रजांसारखं वागू नका”