लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील जनता हळूहळू कोरोना संकटातून सावरत असतानाच चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोना नियमांचं योग्य पालन केल्यामुळे राज्यात डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा १४ फेब्रुवारीला एकाच दिवसात सर्वाधिक ४ हजारांवर रुग्ण आढळले आहेत. ६ जानेवारीला एकाच दिवसात ४ हजारांवर रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत ४ हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आदी महापालिकांमध्ये नियमांची पायमल्ली सुरू आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. ठाण्यात ४७४०, पुण्यात ६२१६ तर नाशिकला १३७९ सक्रीय रुग्ण आहेत.
विदर्भातही कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ व नागपूर या शहरात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अमरावतीत फेब्रुवारीच्या १२ दिवसात २५४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गडचिरोलीत १ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत ३७६ जण बाधित झाले आहेत.
Comments
Loading…