in

मुंबईत पुन्हा कोरोनाचे संकट; चेंबूरमध्ये लॉकडाउन?

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात करोना संकट वाढत असून आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य प्रशासानची चिंता वाढली आहे. मुंबईत सोमवारी ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्के झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा लॉकडाउनचं संकट घोंघावू लागलं आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या चेंबूरमधील एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना कोरोना चाचणी करण्यात सांगण्यात आलं आहे. येथील सर्वाधिक रुग्ण उंच इमारतींमधील आहेत. इतकंच नाही तर पालिका अधिकाऱ्यांनी करोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

एका आठवड्यापूर्वी या वॉर्डमध्ये दिवसाला १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र आता हे प्रमाण २५ वर गेलं आहे. दिवसाला रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यांवर पोहोचला असून पालिका अधिकारी यासाठी नागरिकांकडून सर्रासपणे होणारं नियमांचं उल्लंघन यासाठी जबाबदार असल्याचं सांगत आहेत. परिस्थितीची दखल घेऊन पालिकेने निवासी सदनिकांना नोटीस पाठवली असून करोनासंबंधित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?

नोटीसमध्ये सोसायटींना पाच मुख्य नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे –
१) घरकाम करणाऱे, दूधवाला यांच्यासहित इमारतीत बाहेरील कोणत्याही व्यक्तीला परवानगी देऊन नका.
२) थर्मल स्क्रिनिंगसारख्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करा
३) जर करोना रुग्ण आढळला तर कुटुंबाने १४ दिवस अलगीकरणात राहण अनिवार्य
४) हाय-रिस्क असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांची करोना चाचणी करणं अनिवार्य
५) सोसायटीमध्ये लक्षणं असणाऱ्यांचीही चाचणी बंधनकारक

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘माँ कँटीन’ देणार पाच रूपयांत जेवण

‘टूलकिट माहितीसाठी, हिंसा पसरवणं हा उद्देश नव्हता’