लोकशाही न्यूज नेटवर्क
अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरू असून बुधवारी या जिल्हात एकाच दिवशी चक्क 359 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर गेल्या आठवड्याभरापासून दररोज 200च्यावर कोरोना रुग्ण आढळत असल्याने खळबळ निर्माण झाली. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पाऊले उचलने आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर जिल्ह्यातील गुरुदेवनगर ग्रामपंचायतने आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे कोरोना लसीकरण मोहीम राज्यभरात सुरू झाली असली तरी कोरोनाचा संसर्ग थांबता-थांबेना अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात निर्माण झाली असतांना नागरिकांनी आता पुन्हा एकदा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे झाले आहे.
कोरोनाचा शिरकाव हळू-हळू वाढत असून या गंभीर परिस्थितीचे अवलोकन करता आता प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दिशेने तर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन नियमांचे पालन करीत आवश्यक ती पाऊले उचलणे गरजेचे आहे. आजपासून ग्रामीण भागात कोरोना तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे तर गुरुदेवनगर गावात अलर्ट घोषित करण्यात आला असून येथील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.
Comments
Loading…