in ,

कोरोनामुक्त गाव करा आणि जिंका 50 लाख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘जनता संवाद’ मध्ये ‘कोरोनामुक्त गाव’ मोहीम राबवण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवणाऱ्या गावाला ५० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. त्याचबरोबर गावातील विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ‘जनता संवाद’ मध्ये कोरोनामुक्त गाव मोहीम हाती घेण्याचे म्हटले. या मोहिमेबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठीच सरकारने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेची माहिती देताना हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यात एकूण ६ महसूल विभागांमध्ये प्रत्येकी ३ अशी एकूण १८ पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यात पहिल्या क्रमांसाठी ५० लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १५ लाख रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. पारितोषिक जिंकणाऱ्या गावांना पारितोषिकाची रक्कम गावातील विकास कामांसाठी वापरता येणार आहे. ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेसाठी एकूण २२ निकष असणार आहेत. यात एकूण ५० गुणांची रचना केली जाईल. सर्वाधिक गुण पटकावणारं गाव विजयी घोषीत करण्यात येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा श्रेया घोषालनं काय ठेवले मुलाचे नाव …

Sushant Singh Rajput | सुशांतला ड्रग्ज पुरवणारा हरीश खान एनसीबीच्या जाळ्यात