in

राज्यात कोरोनामुळे उद्योगबंदी आणि बेरोजगारीत वाढ

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सर्वसामान्याच्या जीवनावर याचा खूप मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर राज्यात मोठय़ा प्रमाणावर उद्योग बंद पडले तसेच बेरोजगारी वाढली. हे सर्व संपर्क’ या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले. संपर्क’या संस्थेने विधानसभेतील आमदारांना प्रश्नावली पाठवून त्यांना वर्षभरात आलेला अनुभव याचा आढावा घेतला. टाळेबंदीमुळे कारखाने मोठय़ा प्रमाणावर बंद पडले. मध्यम उद्योगांना याचा फटका बसला. पाहणीत प्रतिसाद दिलेल्या आमदारांपैकी ७५ टक्के आमदारांनी आरोग्य सेवेतील सुधारणा ही पुढील निवडणुकीपूर्वी प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील ७८ टक्के उद्योग बंद पडले, तर बेरोजगारीत ७२ टक्के वाढ झाल्याचा दावा या संस्थेने केला. ही बाब महाराष्ट्रासाठी फारच हानीकारक असून, त्याचा राज्याच्या एकूणच आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणारा आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षांत एकूण तरतुदीच्या ३३ टक्के च रक्कम विकासकामांना उपलब्ध होईल. उद्योगबंद पडणे, विकास कामांवर झालेला परिणाम या साऱ्यातून चक्रवाढ पद्धतीने बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली गेली आहे, असे या पाहणी अहवालाचे समन्वयक शार्दूल मणुरकर यांनी सांगितले.असे राज्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून मिळालेल्या माहितीत समजते

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संयुक्त राष्ट्रसंघातील पदावर आणखी एका भारतीय महिलेची वर्णी

“…तोपर्यंत भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेऊ नये” – गंभीर