in ,

चीनच्या प्रसिद्ध विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव; 1500 विद्यार्थी निरीक्षणाखाली

चीनमधील डेलियनयेथील झुआन्घे विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चीन सरकारने एकाएक शेकडो विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. विद्यापीठातील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहांमध्ये आणि हॉटेलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
चीनच्या डेलियन शहरात कोविड-19 चा पुन्हा एकदा फैलाव झाला आहे. चीन देशाचा लसीकरण दर जगात सर्वात जास्त आहे आणि हिवाळ्यात बूस्टर डोसही दिला जाणार आहे. कोविडचा रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झालेली दिसत आहे. तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील केले आहे. क्वारंटाईनमध्ये राहणे, अनिवार्य कोविड चाचणी आणि प्रवास निर्बंध हा चीनी लोकांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे.

राजधानी बीजिंगमध्ये, विदेशातून येणार्‍या सर्व लोकांना मागील 48 तासांत घेतलेल्या कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण 98,315 रुग्णांची आणि 4,636 मृत्यू नोंद झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात आज 686 नवे रूग्ण, 19 मृत्यूंची नोंद

नवाब मलिकांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार – अनिल बोंडे